ताज्या बातम्या

Ajab Gajab News : १०० वर्षांनंतर दूध आणि चॉकलेट सह हे ९ पदार्थ होणार नष्ट ?

Ajab Gajab News : आजपासून बरोबर १०० वर्षांनी आपल्याला दूध उपलब्ध होणार नाही. हे वाचून धक्का बसला ना ! पण ही भविष्यवाणी रॉबिन नावाच्या एका जगप्रसिध्द फूड फ्यूचरोलॉजिस्ट यांनी केलेली आहे.

त्यांच्या दाव्यानुसार दुधाबरोबरच आणखी ९ पदार्थ की, जे मानवाच्या जीभेचे चोचले पुरवतात, असे आणखी दहा पदार्थही कायमचेच हद्दपार होणार आहेत. रॉबिन यांनी केलेली ही भविष्यवाणी जर खरी ठरली तर खवैय्यांची गोची होणार हे निश्चित. साधारणपणे रॉबिन यांनी केलेली भविष्यवाणी ही अनेक तथ्य संकलनावर आधारित आहे.

या भविष्यवाणीचा सर्वाधिक परिणाम हा गोड खाणाऱ्यांवर होणार आहे. याचे कारण म्हणजे या अन्नपदार्थामध्ये चॉकलेटचा समावेश आहे, आणि चॉकलेट ज्या कोको ट्री पासून तयार होते ती वनस्पतीच नामशेष होणार आहे.

अर्थात याला पर्याय म्हणून जेनेटिकली मॉडिफाय करून चॉकलेट तयार करता येईल. पण, नैसर्गिक चॉकलेटचा फिल नसणार हे निश्चित. याबरोबरच अॅव्हाकॅडो, टोफू, नैसर्गिक मध, काबुली चणा यांचा समावेश आहे.

रॉबिन यांच्या संशोधनाचा निष्कर्ष असा सांगतो की, हवामानामधील बदल आणि जनावरांचे पालन करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे हे सर्व संकट येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts