लाहोर : पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या शिफारशीनंतर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) (National Assembly of Pakistan) बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता विरोधकांचा डाव इम्रान खान यांनी उलटून पाडला असल्याचे समजते आहे.
इम्रान खान यांनी पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती आरिफ अल्वी (Arif Alvi) यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय (Big decision) घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये (pakistan) 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तोपर्यंत इम्रान खान हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहे.
परंतु, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर इम्रान खान यांनी संसदभंग करण्याची शिफारस करून विरोधकांना आखाडा दाखवला आहे. इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची आणि त्यांना अटक करण्याची विरोधकांची खेळी इम्रान खान यांनी उधळून लावली आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड पुकारलं होते. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाणार असल्याचे बोललं जात होते. मात्र, इम्रान खान यांच्या खेळीमुळे संसद भंग करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
तसेच इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अविश्वास प्रस्ताव हा परदेशी षडयंत्र होत, असा आरोप केला आहे.
राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. निवडणुकीनंतरच कोण पाकिस्तानवर राज्य करेल हे दिसून येईल, असं खान यांनी म्हटले आहे.