जामीन मिळाल्यानंतर बाळासाहेब नाहाटा म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  कोरोना काळात प्रभावी काम केल्याने व तालुक्यातील अधिकारी व निष्क्रीय काही पुढारी यांना उघडे पाडल्यामुळे तसेच पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने माझ्या विरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले गेले.

माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात अशी अनेक षडयंत्रे रचली गेली. मात्र मी पुरून उरणार असल्याचे श्रीगोंदे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांनी सांगितले.

श्रीगोंदे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांच्यावर गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बूट मारल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा याबाबत गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात नाहटा यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. नाहटा यांनी सांगितले की, मला राजकारणात अनेक नेत्यांनी मला त्रास दिला. माझ्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केले. मी कधीही थांबलो नाही.

पुन्हा नव्याने जनतेच्या सेवेत हजर झालो. कोविड काळात मी व माझे सहकारी जीव धोक्यात घालून रात्रदिवस काम करत होतो. त्यावेळी तालुक्यातील काही निष्क्रिय पुढारी घरात बसून गप्पा मारत होते.

प्रत्यक्षात मात्र जनतेल मदत करण्याची त्यांची दानत दिसली नाही. लोणी व्यंकनाथ कोविड सेंटरच्या माध्यमातून ६७५ रुग्णांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत असताना संपूर्ण तालुक्यात ८०० पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलेंडर मदत केली.

माझे चिरंजीव गावचे विद्यमान उपसरपंच मितेश नाहाटा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तालुक्यातील प्रत्येक कोविड सेंटरला दीड लाख रुपये रोख मदत केली. सर्व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांना आधार दिला.

प्रत्येक कोविड चालकांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यातील काही राजकीय पुढाऱ्यांना पोटशूळ उठल्याने त्यांनी माझ्या ग्रामपंचायतीच्या कामात खोड्या करून कुरघोडीचा प्रयत्न केला.

त्यात गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांचा वापर करून माझ्या ग्रामपंचायत व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला. याच्या पाठीमागे एक दलबदलू नेता कार्यरत होता.

त्यानेच कागाळ्या करून गटविकास अधिकारी काळे याना माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. तालुक्यातील पदाधिकारी व अधिकारी यानी कितीही त्रास मला दिला तरी मागे हटणार नाही. जनतेच्या सेवेत पुन्हा जोमाने काम करत राहील

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts