शेतकऱ्यांच मोठं टेन्शन मिटलं ! आता ‘या’ ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना ओळखता येणार पिकाला झालेला रोग ; फोटो काढताच समजणार रोग

Agriculture News : शेतकरी बांधवांना शेती करताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने हवामान बदलामुळे पिकांवर येणारे वेगवेगळे रोग आणि कीटकांचे आक्रमण याचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसत असतो.

अनेकदा शेतकरी बांधवांना पिकावर आलेले रोग आणि कीटक ओळखता येत नाहीत. परिणामी पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. मात्र आता शेतकरी बांधवांचे हे मोठे टेन्शन मिटणार आहे. शेतकरी बांधवांना आता एका विशिष्ट एप्लीकेशनच्या मदतीने पिकावर कोणता रोग आला आहे ते अवघ्या दोन मिनिटात समजणार आहे.

विशेष म्हणजे या ॲप्लिकेशनच्या मदतीने एक फोटो क्लिक करताच शेतकरी बांधवांना या रोगाची माहिती उपलब्ध होणार आहे. या अँप्लिकेशनची निर्मिती देखील एका प्रतिष्ठित स्विस ऍग्रोकेमिकल कंपनीने केली आहे. Syngenta या कंपनीने एक भन्नाट ॲप्लिकेशन तयार केले असून त्याच्या मदतीने शेतकरी बांधवांना पिकांवर आलेल्या रोगांची माहिती दोन मिनिटात समजणार आहे.

खरं पाहता Syngenta या कंपनीने ऑगस्टमध्ये Cropwise Grower App हे मोबाईल ऍप विकसित केलं होतं. आता या अँपमध्ये अजून एक मोठा संशोधन करण्यात आलं असून यामध्ये पिकांवर कीड किंवा रोगांचे आक्रमण ओळखण्यासाठी एक फिचर समाविष्ट करण्यात आले आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये सादर केलेल्या क्रॉपवाईज ग्रोअर अँपमध्ये ‘क्रॉप डॉक्टर’ हे नवीन फिचर समाविष्ट केले आहे. निश्चितच या फीचरमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे एक मोठ टेन्शन निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान आज आपण या फीचर्स विषयी आणि या ॲप्लिकेशन विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आता सर्वात मोठा प्रश्न अँप्लिकेशन काम कस करेल 

शेतकऱ्यांना आता मोठा प्रश्न पडला असेल की हे ॲप्लिकेशन काम तरी कसं करत असेल तर याचे उत्तर Syngenta India Pvt Ltd चे फार्मर सेन्ट्रिक इकोसिस्टमचे प्रमुख सचिन कामरा यांनी दिले आहे. ते म्हणाले, “हे फिचर वापरण्यासाठी शेतकर्‍यांना फक्त Cropwise Grower अॅपवरून फोटो क्लिक करणे आवश्यक आहे. क्रॉप डॉक्टर कीटक किंवा रोग ओळखेल आणि यावर वापरल्या जाऊ शकणाऱ्या सिंजेंटा उत्पादनांची माहिती देईल.”

अजून अनेक अपडेटेड टेक्नॉलॉजी येणार असल्याचा केला जातोय दावा 

Syngenta ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी आता बियाणे निवडीपासून कापणी आणि विपणनापर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान आणत असल्याचा कंपनीकडून दावा होत आहे. या तंत्रज्ञानामध्ये सॅटेलाइट ड्रोनचा वापर केला जाणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानावरही काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये संगणक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कीटकनाशक फवारणीप्रमाणे संगणक नियंत्रित प्रणालीद्वारे फवारणी फक्त तणांवर केली जाईल. ही एक यांत्रिक प्रणाली असेल.

ऐकलंत का…! ड्रोनद्वारे पिकांचे निरीक्षण करता येणं सोपं होणार आहे 

अलीकडेच भारत सरकारची परवानगी मिळाल्यानंतर सिंजेंटाने ड्रोनद्वारे शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक फवारणीची सुविधा सुरू केली आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनमध्ये 16 लिटरची टाकी आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. त्यावर कॅमेरा लावून संपूर्ण शेतात पिकाची स्थिती पाहता येते. कोणत्याही भागातील पिकात काही अडचण आल्यास बघता येते. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान टाळता येण्यास मोठी मदत होणार आहे.

Ajay Patil

Recent Posts