अहमदनगर ब्रेकींग: भाजपच्या ‘या’ पदाधिकार्‍याला धमकी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 :- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे यांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

तशी तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अधीक्षक पाटील यांची भेट घेवुन निवेदन दिले आहे.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिवे मारण्याची धमकी देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, 15 दिवसांच्या आतमध्ये तडीपारीचा प्रस्ताव सादर करावा,

अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनात पोटरे यांनी म्हटले आहे की,

भाजपाचे काम करत असताना विरोधक या नात्याने सातत्याने आमदार रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर व राजकीय भूमिकांवर तसेच माजी मंत्री शिंदे

यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजुर केलेल्या व सद्य स्थितीत अपुर्ण असलेल्या विकास कामांबददल पक्षाच्या वतीने मिडीया सोशल मिडीया व विविध वृत्तपत्रात भाजपाची भुमिका मांडत असतो.

यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील गुंड प्रवृत्तीच्या व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने मोबाईलवर हॉटसअ‍ॅप वर व प्रत्येकक्षात समोर आल्यावर धमकावले जात आहे.

मला फेसबुक हॉटसअ‍ॅप व प्रत्येकाक्षात जिवे मारण्याची धमकी देवुन सोशल मिडियावर माझी बदनामी केली. कर्जत तालुक्यात दहशत असलेल्या पाच ते सहा कार्यंकर्त्यांकडून जिवीतास धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts