अहमदनगर ब्रेकिंग : पुण्याकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरोचा घाटात अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-नाशिक-पुणे महामार्गावरून पुण्याकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बोलेरोला संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात अपघात झाला आहे.

यात चालक जखमी झाला असून हा अपघात आज सकाळी साडे सात वाजता झाला आहे, यात वाहनाचे व आंब्याचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे किमहामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणारी बोलेरो पिकअप (एम.एच.१४ जे.एल.०३८७) संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात आली असता चालक मनोज गोविंद साठे याला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा पिकअपवरील ताबा सुटला व पिकअप महामार्गावर उलटली.

यात चालक मनोज साठे किरकोळ जखमी झाला असून पिकअप मधी आंबे महामार्गाच्या लगत पडले होते. अपघातामुळे आंब्यांचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात तीव्र वळण असल्याने अनेकदा वाहन चालकांचे वाहनांवरील ताबा सुटून अपघात झालेले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts