अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- ऊसाच्या शेतात लपवून ठेवलेली गांजाची पॅकिंग असलेली शेकडो गाठोडी पोलिसांनी जप्त केली आहेत. यात काही चंदनाची लाकडे असलेली पण गाठोडी आहेत.
हि कारवाई पांढरीपुल- शेवंगाव रस्त्यावर मिरीच्या जवळ असलेल्या शंकरवाडी शिवारात करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणहून साधारण पाचशेच्या वर पॅकिंग करून ठेवलेला हा मुद्देमाल बापू आव्हाड आणि साहेबराव आव्हाड यांच्या मालकीच्या शेतातील ऊसाच्या मध्ये लपवून ठेवला होता.
साधारण पाचशे किलोच्यावर हा गांजा असल्याने त्याची किंमत पन्नास लाखावर असू शकते. दरम्यान निश्चित मुद्देमाल, त्याची एकूण बाजार किंमत आणि आरोपीं याबाबत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही आहे.
शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पाथर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.