अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने आज मार्च महिन्यात सर्वाधिक बाधितांचा विक्रम नोंदविला.
मागील 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.
यावेळी जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आदेश जारी करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरण ऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार आहे.
त्याचबरोबर, वाढती संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.