ताज्या बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : एकनाथ शिंदे सरकारनं आपली परीक्षा पास केली ! आमदार संग्राम जगताप पोहोचलेच नाहीत..

Maharashtra news:आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे.

काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली.

यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतं पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाच्या विरोधात 107 मतं पडली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही.

या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आजच्या प्रस्तावाच्या वेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या परीक्षेतून पार पडले आहेत. विधानसभेत त्यांनी बहुमत चाचणी उत्तीर्ण केली आहे. त्यांना 164 मते मिळाली आहेत. त्याचवेळी सरकारच्या विरोधात 99 मते पडली. चाचणीनंतर महाराष्ट्र विधानसभेतही श्री रामचंद्र की जय, भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या.

असे अनेक आमदार होते ज्यांना मतदान करता आले नाही. विधानसभेत असूनही मतदानात भाग न घेणारे काही जण होते, त्यामुळे विरोधकांना फटका बसला.

विरोधी पक्षाच्या चार आमदारांना मतदान करता आले नाही. त्यात अशोक चव्हाण, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा समावेश आहे. चौघांनाही उशीर झाला. त्यानंतर त्यांना प्रवेश दिला गेला नाही.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts