Ahmednagar Breaking : एक कोटी लाच मागणारा अभियंता वाघ देशाबाहेर पळण्याच्या तयारीत, राज्यभर शोध सुरु

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील १ कोटीच लाच प्रकरण राज्यभर गाजले,महाराष्ट्रातील सर्वात मोठे लाच प्रकरण दोन दिवसांपूर्वी समोर आले होती. दोन अभियंत्यांनी तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणात एका आरोपी अटक करण्यात आली आहे

यानंतर झालेल्या अनेक उलगड्यांनी राज्यात खळबळ उडाली. यामध्ये अमित गायकवाड ताब्यात घेतला. परंतु एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ हा मात्र अद्यापही पसारच आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तो विमानाने राज्याबाहेर अथवा देशाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या शोधासाठी चार जिल्ह्यांत पथके रवाना करण्यात आलीयेत. तसेच तो देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी विमानतळ प्राधिकरणाला देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अमित गायकवाडच्या घरात काही सापडले नाही

सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड हा सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्या नगर येथील घरझडतीमध्ये संसारोपयोगी साहित्याशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे पथकाला काहीच धागेदोरे मिळाले नाहीत.

देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी…

या कंत्राटदाराने लाचलुचपतकडे धाव घेताच शनिवारी दुपारी नगर शहराजवळ १ कोटीची लाच घेतांना सहाय्यक अभियंता गायकवाड हा लाचलुचपतचा जाळ्यात अडकला. याची माहिती वाघ याला मिळताच तो कुटुंबासह फरार झाला.

सध्या पोलीस त्याच्या मागावर असून छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, मुंबई व पुणे येथे पथके पाठवण्यात आली आहेत. तसेच, तो राज्याबाहेर किंवा देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी विमानतळ प्राधिकरणालाही माहिती देण्यात आलेली आहे.

दोघांच्या बँक लॉकरची होणार तपासणी

गायकवाड व वाघ या दोघांचे बँक लॉकर आज सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी तपासले जाणार आहे. बँक लॉकर्ससह अन्य ठिकाणी देखील तपासणी केली जाण्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यातून काही गोष्टी समोर येऊ शकतात असा अंदाज आहे.

लाचखोरांकडे नेमके किती मायाजाळ

लाचखोरांकडे नेमके किती मायाजाळ आहे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. सध्या कोठडीतील गायकवाडच्या संपत्तीची माहिती संकलित केली जात आहे. त्याची इतरत्र किंवा इतरांच्या नावावर बेनामी संपत्ती आहे का, याचाही शोध सुरू आहे.

दरम्यान, कोठडीत असलेला आरोपी गायकवाड याने चौकशीत फारशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता त्याची पोलीस कोठडी वाढणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमके काय घडले होते प्रकरण

अहमदनगर एमआयडीसी येथील तत्कालीन उपअभियंता व सध्या धुळे येथे कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ व सहायक अभियंता अमित गायकवाड या दोघांनी मिळून हे लाचेचे कांड केले. त्यांनी एका शासकीय कंत्राटदाराच्या केलेल्या पाइपलाइनच्या ३१ कोटींच्या कामाचे थकीत २.६६ कोटींचे बिल काढण्यासाठी व बिलावर मागील तारखेच्या सह्या करण्यासाठी लंच मागितली. तेही तब्बल १ कोटी रुपयांची.

अहमदनगरजवळ सापळा रचून कारवाई

छत्रपती संभाजीनगरच्या मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस कंपनीचे मालक अरुण गुलाबराव मापारी यांनी नाशिकच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने अहमदनगरजवळ सापळा रचून शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली गेली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

बिलांची बक्षीस म्हणून एक कोटी रुपये लाचेची मागणी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कंत्राटदार अरुण गुलाबराव मापारी यांच्या मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम. एम. व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रुपयांचे बिल मिळावे म्हणून ते पाठपुरावा करत होते.

मात्र, या बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्याकडून मागील तारखेचे आउटवर्ड करून त्यावर त्याच्या सह्या घेवून हे देयक पाठवण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्यासाठी ही लाच मागितली.

या बिलाच्या कामाचे व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षीस म्हणून एक कोटी रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले होते. तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

तुझ्या कष्टाचे चांगले फळ मिळाले !

कोटीच्या लाचेची रक्कम हाती पडल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (मऔविम) एका अभियंत्याने दुसऱ्या सहकारी अभियंत्याकडे भ्रमणध्वनीवरुन तुझ्या कष्टाचे चांगले फळ मिळाले, अशा शब्दांत भावना व्यक्त केली. उभयतांमधील संभाषणाचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी येथे सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts