अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू होती.
गुंजाळे येथील वसंत लक्ष्मण शिंदे व त्याची पत्नी अलका यांच्यात परगावी असलेल्या मुलाला भेण्यासाठी जाण्यावरून वाद झाले. या वादानंतर रागाच्या भरात वसंत शिंदे याने पत्नी अलका हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार करून डोक्यात टणक वस्तूने मारहाण करून अलका हिची हत्या केली.
आज सकाळी मयत अलका हिचा मृतदेह डोंगराकडे झोपडीत मिळून आला. घटनास्थळी वांबोरी पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी दाखल झाले. मयत अलका हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आला. या खुनप्रकरणी वसंत शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.