अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अकोले तालुक्यात अवैध दारू विकणाऱ्यास विरोध करत असल्याच्या कारणावरून रविवारी (६ जून) रात्री खडकी बुद्रूक येथील काळू भगवंता बांडे (वय ३०) या कार्यकर्त्याच्या डोक्यात लोखंडी पाइप काठ्या, गजाने मारहाण करून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांनी घरात घुसून खून केला.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत येथील श्रीदत्त मंदिरात उपोषण सुरू केले. पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी लेखी हमी दिल्यानंतर सोमवारी ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतले.
पोलिसांकडून यातील आरोपीस अटक करण्यात आली. आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यापुढे खडकी बुद्रूक गावातून अवैध दारू विक्री होणार नाही, हे पोलिस प्रशासनाने लेखी दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही,
असा पवित्रा घेतला. यासाठी ग्रामस्थांनी राजूर येथील श्रीदत्त मंदिरात एकत्रित येऊन मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देत उपोषणाचा निर्णय घेतला. खडकी बुद्रूक ग्रामस्थांनी राजूर पोलिस स्टेशनला येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.
राजूर पोलिसांनी मृताचे वडील भगवंत शंकर बांडे यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना निवेदन दिले. निवेदनात खडकी बुद्रूक गावात अवैध दारू बंदीची मागणी केली.
रविवारी सायंकाळी खडकी बुद्रूक गावात अवैध दारू विक्रेते व आरोपी भीमा चिंतामण बांडे, हरिश्चंद्र बाजीराव बांडे, स्वप्नील भीमा बांडे हे घरासमोर आले.
माझा मुलगा वाळू भगवंत बांडे व इतर दोन मुले यांना काळू भगवंत बांडे, बाळू भगवंत बांडे यांनी मारहाण केली त्यात बाळू बांडे याच्या डोक्यात गज घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
राजूर पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली. हे आरोपी खडकी बुद्रूक गावात अवैध दारू विक्री व्यवसाय करत असल्याने खडकी ग्रामस्थांनी राजूर पोलिसांना यापूर्वीही अर्ज दिले होते. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा खून झाल्याचा आरोप केला.