अहमदनगर ब्रेकिंग : खासगी कोविड सेंटरकडून २५० कोटींची लूट !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण संगमनेरला असून सरकारची जबाबदारी असताना मोठ्या प्रमाणावर खाजगी कोविड सेंटर सुरु करुन सामान्य माणसांची अडीचशे कोटी रुपयांची लूट येथील कोविड दवाखान्यांनी केली.

त्याची चौकशी झाली पाहिजे. रुग्णांचे सेवेअभावी हाल झाले, तर १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू येथे झाला. संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते कोठे होते, अशी टिका माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

मालपाणी लॉन्स येथे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अायाेजित भाजपच्या वज्रनिर्धार मेळाव्यात आमदार विखे बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, शिरीष मुळे, जावेद जहागीरदार, मेघा भगत, वसंत गुंजाळ,

योगराज परदेशी, विक्रम खताळ यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, संगमनेरमध्ये कित्येक रुग्णांना बेड, रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन उपलब्ध झाले नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णांना वाचविण्यासाठी धडपड केली, त्यांना धन्यवाद देतो. केंद्र सरकारकडून लसीकरण होतंय. अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. १

५८ कोटी रुपयांची मदत संगमनेरला विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून मिळाली आहे. सर्व काही केंद्र सरकारने द्यायचे, मग तुम्ही सत्ता भोगायला आहे का? अशी टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. संगमनेर तालुक्याची ठेकेदारी संस्कृती थांबली पाहिजे.

सूक्ष्म पद्धतीने प्रचार यंत्रना राबवून त्याची मुहूर्तदेढ पालिकेच्या निवडणुकीतून करा मी तुमच्या बरोबर आहे, असेही आमदार विखे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts