अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव परिसरात सोमवारी दुपारी अनोळखी पुरुषाचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. याबाबत घारगावचे पोलिस पाटील सतीश निंभोरे यांनी बेलवंडी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा मृतदेह शहीद अंबादास पवार पेट्रोल पंपाच्या शेजारी लालासाहेब भाऊसाहेब पानसरे यांच्या शेतात सापडला. मृत व्यक्तीचे शरीराचा बांधा सडपातळ आहे.
रंग काळासावळा आहे. त्यांचे अंगावर काळी नाईट पॅन्ट आहे.सहायक फौजदार मधुकर सुरवसे यांनी या मृतदेहाचा पंचनामा केला आहे.
या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास बेलवंडी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सुरवसे यांनी केले आहे.