अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून मोबाईल वर चित्रीकरण करण्याच्या नादात तोल गेल्याने एका शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु झाला असुन या मृत्युमुळे भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षे यंत्रणेचे पुन्हा लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत.
अकोले तालुक्यातील ब्रिटिश कालीन भंडारदरा धरण हे उत्तर नगर जिल्ह्याची जीवन रेषा समजले जाणारे.या धरणाच्या भिंतीवरुन शुक्रवारी दुपारी उज्जला बाळु वैराळ या ईयत्ता अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा ५० च्या वाॅल जवळ पडुन दुर्दैवी मृत्यु झाला आहे .
भिंतीवर या मुलीचे ओळख पत्र व महाविद्यालयीन सँक एका आठवडे बाजारासाठी जाणा-या महिलेला निदर्शनास आल्याने सदर महिलेने सहज भितीवरुन धरणाच्या तळाशी डोकाऊन बघितले असता एक मुलगी खाली पडली असल्याचे लक्षात आले . तात्काळ ही माहीती धरणावरील सुरक्षेस असलेल्या सुरक्षा पोलिस गार्डने वरिष्ठांच्या कानावर घातली .
मृत मुलीच्या अपघाताचा पंचनामा राजुर पोलिंसांनी केला असुन मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरच्या ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला असुन अधिक तपास राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .ह . देविदास भडकवाड , पो .काॅ. दिलीप डगळे , अशोक काळे , अशोक गाडे हे करत आहेत .
तालुक्यातील भंडारदरा धरणावरुन पडुन एका शालेय विद्यार्थीचा पडुन मृत्यु झाल्यामुळे पुन्हा एकदा धरणाची सुरक्षा यंत्रणा कुचकामी झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.
या भिंतीवरुन रहदारी करण्यास मज्जाव घालण्यात आलेला असताना देखील ही युवती धरणाच्या भिंतीवर पोहचलीच कशी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे .