अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- मागील भांडणाच्या कारणावरुन युवकावर थेट तलवार व लोखंडी रॉडने हल्ला करुन जबर जखमी केले. ही घटना संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्सजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सोमनाथ पोगुल (वय ३० रा. जय जवान चौक, संगमनेर) व शुभम शिंदे यांच्यात पाच ते सहा महिन्यापूर्वी भांडण झाले होते. याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान योगेश पोगुल हा सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फिरत असतांना तेथे शुभम आला.
या ठिकाणी त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी तेथे उभ्या असलेल्या युवकांनी लोखंडी रॉडने योगेश याला मारहाण केली. शुभम शिंदे याने त्याच्या हातातील तलवारीने डोक्यावर वार केले. वार वाचविण्यासाठी त्याने हात वर केल्याने योगेश पोगुल याचा उजवा हात फॅक्चर झाला.
याबाबत योगेश पोगुल याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी शुभम शिंदे, अमित राहतेकर, धीरज राहतेकर, पंकज दूधे, रवि म्हस्के, अनिल गायकवाड, पप्पु गायकवाड, इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी हे करत आहेत.