आज १८४२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १९९८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.८९ टक्के अहमदनगर जिल्ह्यात आज १८४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३ हजार ७४९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२९८३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३७ आणि अँटीजेन चाचणीत १००४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१८, जामखेड ६७, कर्जत ७९, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ४१, नेवासा ०८, पारनेर ३८, पाथर्डी २३, राहता १९, राहुरी ०९, संगमनेर ६७, शेवगाव १५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट बोर्ड १३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ इतर जिल्हा इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९८, अकोले ११, जामखेड ०४, कर्जत ०३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण २२, नेवासा ०९, पारनेर ०४, पाथर्डी ०६, राहाता ७४, राहुरी १४, संगमनेर २३, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ३१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा १४ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १००४ जण बाधित आढळुन आले. मनपा ६६, अकोले ७१, जामखेड ०२, कर्जत १४०, कोपरगाव ५१, नगर ग्रामीण ८७, नेवासा ६५, पारनेर ४४, पाथर्डी १०५, राहाता ३१, राहुरी १०५, संगमनेर २१, शेवगाव ८८, श्रीगोंदा ६२, श्रीरामपूर ५९, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६६६, अकोले ६९, जामखेड २३, कर्जत ३३, कोपरगाव १०९, नगर ग्रामीण १२९, नेवासा ५४, पारनेर ६१, पाथर्डी ५९, राहाता १४१, राहुरी ६४, संगमनेर ११३, शेवगाव ९४, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर १५०, कॅन्टोन्मेंट २५,मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा २३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,०३,७४९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१२९८३
  • मृत्यू:१३१३
  • एकूण रूग्ण संख्या:१,१८,०४५
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24