अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१० टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ९६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०७ आणि अँटीजेन चाचणीत ३०१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०३, जामखेड ०३, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ३५, नेवासा ०२, पारनेर ०१, पाथर्डी २२, राहुरी ०५, संगमनेर ३५, शेवगाव ०२, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले १०, जामखेड ५०, कर्जत २०, कोपरगाव ०५, नगर ग्रा.१०, नेवासा ३५, पारनेर ४६, पाथर्डी ०४, राहाता ३४, राहुरी ३१, संगमनेर २४, शेवगाव ४०, श्रीगोंदा ४६, श्रीरामपूर ३०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३०१ जण बाधित आढळुन आले. मनपा १२, अकोले २७, जामखेड ०७, कर्जत ११, कोपरगाव २३, नगर ग्रा. ०९, नेवासा ३०, पारनेर ४१, पाथर्डी ३१, राहाता १३, राहुरी ०६, संगमनेर २९, शेवगाव ०७, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर १९ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १२१, जामखेड ९६, कर्जत ४५, कोपरगाव ६२, नगर ग्रामीण १३२, नेवासा ३८, पारनेर १४०, पाथर्डी ७५, राहाता ६४, राहुरी १०६, संगमनेर ११७, शेवगाव १८०, श्रीगोंदा ९७, श्रीरामपूर १६६, कॅन्टोन्मेंट ०८, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)