अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७७ आणि अँटीजेन चाचणीत ३९८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०५, जामखेड ६४, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २७, नेवासा ५१, पारनेर ४९, पाथर्डी ४८, राहता २४, राहुरी ०१, संगमनेर ४३, शेवगाव ११७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०५ आणि इतर जिल्हा ०९ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४४, अकोले ०९, जामखेड ३२, कर्जत ४९, कोपरगाव ७१, नगर ग्रा.२४, नेवासा ९४, पारनेर २३, पाथर्डी ०८, राहाता २५, राहुरी ४९, संगमनेर २६, शेवगाव ४७, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ५२ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३९८ जण बाधित आढळुन आले.

मनपा ०८, अकोले ३३, जामखेड १३, कर्जत ४४, कोपरगाव २६, नगर ग्रा. १७, नेवासा ४२, पारनेर २१, पाथर्डी ६४, राहाता १०, राहुरी १९, संगमनेर २१, शेवगाव १८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ३३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२६, अकोले १०४, कर्जत ३१, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण ११७, नेवासा ५७, पारनेर १३०, पाथर्डी ७२, राहाता ४१, राहुरी ५९, संगमनेर १६८, शेवगाव १३, श्रीगोंदा ८७, श्रीरामपूर ३८, कॅन्टोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts