अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २८ हजार ५८२ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ९०० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९३ आणि अँटीजेन चाचणीत २१४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०४, जामखेड १५,
कर्जत ०२, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १३, नेवासा ०२, पारनेर ४६, पाथर्डी ३१,राहता ०१, राहुरी ०४, संगमनेर ५८, श्रीगोंदा ५६ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ५०, जामखेड ०३, कोपरगाव २०, नगर ग्रा.१८, नेवासा १५, पारनेर १८, पाथर्डी ०९, राहाता ५७, राहुरी १६, संगमनेर ७५, शेवगाव ५८, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २१४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले ३२, कर्जत २५, कोपरगाव ०५, नगर ग्रा. ०९, नेवासा २१, पारनेर २६, पाथर्डी २२, राहाता ०४, राहुरी ०४, संगमनेर ४२, शेवगाव ०८, श्रीगोंदा १०, श्रीरामपुर ०३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ४९, जामखेड २३, कर्जत ४६, कोपरगाव ३४, नगर ग्रा. ४९, नेवासा ४८, पारनेर ७३, पाथर्डी ३२, राहाता ६५, राहुरी ६१, संगमनेर ९७, शेवगाव ५४, श्रीगोंदा ६४, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,२८,५८२
उपचार सुरू असलेले रूग्ण:४९००
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७६५
एकूण रूग्ण संख्या:३,४०,२४७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)