अहमदनगर जिल्हा हादरला ! जन्मदात्या पित्याची मुलाने केली हत्या ; प्रेत विहिरीत फेकले आणि आई- बहिणीलाही …

कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही.पण अशी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.

आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुऱ्हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेल्या मुलाने मात्र त्याने तो राग मनात साठवून ठेवला आणि सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अकोले तालुक्यातील वारूंघुशी येथील बोर वाडी येथे रामदास लक्ष्मण घाणे (वय ६०) हे आपल्या तीन मुले व तीन मुलीसह राहतात त्यांना राजू, बाळू, काळू ही तीन मुले आहेत व तीन मुली आहेत.

राजू बाहेर गावी राहतो तर बाळू पुणे जिल्ह्यात आपल्या पत्नीसह रोजगारासाठी जातो व महिना- दोन महिन्यांनी घरी येत असतो. काळू हा घरीच असतो. शनिवारी बकऱ्या विक्री वरून बाप लेकात भांडणे झाली. त्यातच काळूने आपल्या बापाचा खून केला.

काळू घाणे याने बापाचा खून करून २५ किलोचे दोन दगड कंबरेला बांधून विहिरीत टाकून दिले व घरातील आई आणि बहिणीला ”तुम्ही कुणाला सांगाल तर तुमचाही काटा काढेल” असा सज्जड दम दिला.

मंगळवारी त्याचा भाऊ बाळू घाणे घरी आला आणि त्याने आईला म्हतारा कुठे विचारले. असे विचारताच आई रडू लागली अन् त्याच वेळी काळू घरातून पळून गेला. ही घटना राजुला कळताच तोही पळत आला.

गुरुवारी सकाळी दोघा भावांनी विहिरीत असलेले आपल्या बापाचे प्रेत वर काढले. पंचनामा करून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office