अहमदनगर बाजारभाव : आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले !

Ahmednagar Bajarbhav : बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी वाढलेल्या भाज्यांच्या किमतीत घट झाली आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे घाऊक दर १० रुपयांनी कमी झाले आहेत.

अवकाळी पावसामुळे भाज्यांचे नुकसान तर मान्सूनने ओढ दिल्याने दरात वाढ झाली होती. मात्र आता आवक वाढल्याने दर घसरले आहेत. महिन्याभरापूर्वी ५० ते ५५ रुपयांना मिळणारी कोंथिबीरची जुडी आता १० रुपयांवर आली आहे.

आवक वाढल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर दर आले आहेत. यामुळे ग्राहक समाधानी असला तरी भाजीपाला उत्पादक मात्र काहीसा निराश झाला आहे.

जुलै महिन्यात गगनाला भिडलेले दर पावसामुळे आज आवाक्यात आले आहेत. दरात आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेथी, कांदापात, शेपू, पालक यांचे दरही १० ते १५ रुपये जुडीवर आले आहेत. हिरवी मिरची अजूनही तिखटच असून ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे.

येत्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर (सर्व दर क्विंटलमध्ये) : टोमॅटो ३०००-९०००, वांगी २५०० ३५००, फ्लावर २५००- ३०००, कोबी १०००-१५००, काकडी १०००-१२००, गवार ५०००-९०००, घोसाळे ३०००- ३५००, दोडका ४५००- ५०००,

कारले २५०० ४०००, भेंडी ३००० – ४०००, वाल ४००० ५०००, घेवडा ३००० ३५००, बटाटे १२०० – २०००, लसूण ६०००- १६०००, हिरवी मिरची २५००-३०००, शेवगा २५००-३०००, भू. शेंग ४००० ५५००, लिंबू १५००- २०००,

आद्रक १४,००० १५,०००, गाजर २०००-२५००, दु. भोपळा १५००-२०००, शिमला मिरची ४०००-५०००, मेथी ४०० -१२००, कोथिंबीर ६०० १३००, पालक ८०० ११००, शेपू भाजी ८००-१५००, चवळी २००० ३०००, कांदा पात १००० – २०००, डांगर ७०० – १४००.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts