Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेचे ३० लाख रुपये वाचणार ! मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवा पर्याय…

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मोकाट कुत्रे प्रकरण प्रचंड गाजले आहे. सध्या ज्या कंपनीकडे ठेका आहे त्या कंपनीने काही काम न करता महापालिकेकडून लाखो रुपये लाटले असल्याचे आरोप झल्यानंतर खळबळ उडाली होती.

दरम्यान आता हे मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम करणाऱ्या पीपल फॉर अॅनिमल या संस्थेच्या निविदेची मुदत बुधवारी ( दि.१३ डिसेंबर ) संपुष्टात आली.

परंतु आता या कंपनीने ‘सीएसआर’ च्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिलाय. जर असे झाले तर साधारण वर्षाला ३० लाख रुपयांपर्यंत महापालिकेची बचत होणार आहे.

नेमके काय आहे कंपनीचे म्हणणे? कसा उचलणार खर्च?

पीपल फॉर अॅनिमल या संस्थेने जो प्राथमिक प्रस्ताव दिला आहे त्यांसुर त्यात असं म्हटलं आहे की, संस्थेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केले जाईल. त्याचा खर्च, तसेच निर्बीजीकरण केल्यावर कुत्री सांभाळण्याचा खर्च सीएसआरच्या माध्यमातून करू.

महापालिकेला केवळ कुत्री पकडणे व किरकोळ व्यवस्थापन खर्च करावा लागेल. जर असे झाले तर महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व निर्बीजीकरण करण्यासाठी दरमहा तीन लाखांपर्यंत खर्च करते. सीएसआरच्या माध्यमातून हे काम केल्यास दरमहा अडीच लाखांपर्यंत खर्चात बचत होऊ शकते.

तीन महिन्यातील कामाचे बिल संस्थेने आकारलेले नाही

पीएफएचे प्रतिनिधी पुनीता खन्ना यांनी म्हटलं आहे की, सीएसआरच्या माध्यमातून निर्बीजीकरण व लसीकरण करण्याबाबत सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेला प्रस्ताव दिलाय. संस्थेच्या कामाची मुदत संपली असून,

तीन महिन्यातील कामाचे कोणतेही बिल संस्थेने आकारलेले नाही. महापालिकेकडून प्रतिसाद मिळाल्यास संस्था सीएसआरच्या माध्यमातून काम करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.

शिवसेनेचा गंभीर आरोप

शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी एक गंभीर आरोप केला होता. सदर संस्थेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण न करता ऑर्गन विकत घेऊन ते समितीपुढे सादर करून लाखो रुपये लाटले असे ते म्हणाले होते.

दरम्यान त्याची दखल घेत महापालिकेने संस्थेला पुन्हा नोटीस बजावली आहे. सात दिवसात म्हणणे सादर करण्याचे निर्देश संस्थेला दिल्याचे डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts