ताज्या बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शहरात बिबट्या घुसला, नागरिक धास्तावले !

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान नागरे पेट्रोल पंपाच्या परीसरात बिबट्या दिसला. पंपाजवळील दुकानदाराची भीतीने घाबरगुंडी उडाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी या ठिकाणी मोठी वर्दळ होती. तात्काळ वनविभागला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी फटाके फोडून गोंगाट केल्याने बिबट्या राजपाल सोसायटीकडे निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले.

या प्रकारानंतर नागरिकांनी परिसरात गस्त सुरू केली आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री ८ जतच्या भतार मुर्शदपूर जेऊर परिसरातून हा बिबट्या शहरात नागरे पेट्रोल पंपावर आला आणि त्यानंतर लोकांनी केलेल्या गोंधळामुळे तो राजपाल सोसायटीच्या बाजूला गेला; परंतु रात्री पुन्हा ‘जोशीनगर भागातून तो इंदिरापथ बैलबाजार या रस्त्यावर फिरताना दिसून आला.

तेथून पुढे असलेल्या कर्मवीर नगरमध्ये काही लोकांना तो दिसला. गुरुवारी दिवसभर टाकी, गवारे नगर, समता नगर या भागात बिबट्या फिरत असल्याचे एका स्थानिक नागरिकाला दिसले. त्यानंतर परिसरात ही माहिती पसरली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

कोपरगाव भागात आता सर्रासपणे बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. इतके दिवस तालुक्यातील मुर्शदपुर ‘व आसपासच्या उसाच्या शेतीत बिबट्याचं वास्तव्य होतं; मात्र आता थेट कोपरगावच्या शहरी भागातही बिबट्या घुसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोपरगावशहरात मोठ्या प्रमाणात गायी, गाढवं, डुकरं, कुत्रे, मोकाट जनावरे मोठया प्रमाणात आहेत. ती रस्त्यावर रात्रंदिवस ठिकठिकाणी बसलेली असतात. त्यामुळे बिबट्यासारख्या प्राण्याला ही सोपी शिकार आहे. त्यामुळे बिबट्या या परिसरातून लवकर जाणार नाही, असे जाणकारांचे मत आहे

बिबट्याच्या भीतीमुळे सकाळ- संध्याकाळ वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी मात्र वॉक आउट केले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव यांनी दुपारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांना बिबट्या शहरात फिरत असल्याच्या गांभीर्याची जाणीव दिली. आपण जाळी घेऊन ज्या ठिकाणी बिबट्या फिरत आहे, त्या भागात लोकांच्या मदतीने हाकारा देऊन बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू, तुम्ही पिंजरा वगैरेची तयारी करा, असे आवाहन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts