Ahmednagar Politics : तब्बल २३ वर्षांनंतर विखे पाटलांना मिळाली ही संधी

Ahmednagar Politics  :- सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतापर्यंत स्थापन झालेल्या बहुतांश सरकारमध्ये ते मंत्री होतेच. मात्र, एक संधी त्यांना त्यांना तब्बल २३ वर्षांनंतर मिळत आहेत.

या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी विखे पाटील १९१७ ते ९९ युती सरकारच्या काळात पालकमंत्री होते.

तेव्हा त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मधल्या काळात ते मंत्री असले तरी पालकमंत्री नव्हते. त्यानंतर थेट आता त्यांना ही संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अलीकडेच विस्तार करण्यात आला. नव्या १८ जणांनी शपथ घेतली. मात्र, तरीही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळू शकत नाही.

अद्याप त्या नियुक्त्याही व्हायच्या आहेत. मात्र, स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करायचे, याची यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अहमदनगरमध्ये विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

हा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते होत असतो. त्यामुळे यापूर्वीच्या अनेक सरकारांमध्ये विखे मंत्री असले तरी ते पालकमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत नव्हता.

पूर्वी युती सकारच्या काळात ते पालकमंत्री होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच युती सरकारच्या काळात त्यांना ही संधी मिळाली आहे. आता पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts