अहमदनगर हादरले ! हुंड्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले …

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील विवाहितेस माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी तिला मारहाण,शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. व तिला पेटवून दिले. यात ती गंभीर जखमी झाली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पती निखिल मेहेत्रे व तिचा सासरा, सासू,दोन दीर, जाव अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कोपरगाव शहर पोलिसानी अटक केली. पूजा मेहेत्रे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

मृत विवाहितेने दोन नवीन घरे बांधण्यासाठी व संसारोपयोगी वस्तू आणण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी तिला १६ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न झाल्यापासून तिला सासरच्यांनी शारीरिक,मानसिक,त्रास दिला.

२६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून पेटवून दिले. विवाहितेस गंभीर भाजलेल्या जखमी अवस्थेत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिचे बुधवारी उपचार सुरु असताना निधन झाले.

या प्रकरणी मृत पूजा हिचे वडील पांडुरंग लोंढे (रा. लिंगटांगवाडी) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी

नवरा निखिल मेहेत्रे,सासरा विलास मेहेत्रे, सासू लता मेहेत्रे, दोन दीर आशिष व स्वप्नील मेहेत्रे, जाव रेखा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts