ताज्या बातम्या

अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; अत्याचार करणार्‍याचा खून

अल्पवयीन मुलासोबत (वय 4) एका 55 वर्षीय व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला.

दरम्यान कृत्य करणार्‍या व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान पीडित मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोनार बाबा विरूध्द गुन्हा दाखल झाला असून

त्याच्या मृत्यूप्रकरणीही खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे.

सोमवारी रात्री फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा किराणा दुकानात गेला असता त्याला सोनार बाबाने त्याच्या घरामध्ये नेले होते.

तेथे त्याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले असल्याची बाब फिर्यादी यांनी पाहिली होती.

त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे नागरिक तेथे जमा झाले. त्यांनी सोनार बाबा याला मारहाण केली होती.

मारहाणीत जखमी झालेल्या सोनार बाबावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts