अहमदनगर शहरातील तरुणाचा जायकवाडी धरणात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर शहरातील भिंगार येथील तरुणाचा जायकवाडी धरणात बुडून मृत्यू झाला. आदेश शिरसाठ असे मृत तरुणाचे नाव आहे.

या तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वा.च्या सुमारास धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

पैठण पोलिस व औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

आदेश हा पैठण तालुक्यातील इसारवाडीत नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी गेला होता. सोमवारी (दि.२१) दुपारी जायकवाडी धरणात तो मित्रांसमवेत आला.

वाऱ्यामुळे लाटा उसळत आहेत, त्यामुळे त्याच्या मित्रांनी पोहोण्यास नकार दिला. मात्र आदेशने मित्रांचा सल्ला न ऐकता पाण्यात उडी मारली.

लाटा उसळत असल्याने त्याला पोहता न आल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.

पैठणचे पोनि. किशोर पवार, सपोनि. गजानन जाधव, रामकृष्ण सागडे, सुधीर ओहळ, राजू पाटोळे आदींनी धरणावर धाव घेवून पाण्यात शोध घेतला.

मात्र सोमवारी उशिरापर्यंत आदेशचा मृतदेह आढळून आला नव्हता. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आदेश शिरसाठ याचा मृतदेह आढळून आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts