ताज्या बातम्या

AirAsia Splash Sale : केवळ दीड हजारात करा जगसफारी, ‘या’ कंपनीने आणली भन्नाट ऑफर

AirAsia Splash Sale : विमानाने (Flight) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणखीच सोपे होणार आहे. कारण खाजगी विमान कंपनी AirAsia India ने अनेक देशांतर्गत मार्गांवर कमी दरात तिकिटांची विक्रीला सुरूवात केली आहे. त्यामुळे तुम्ही देशातील (Country) सुंदर ठिकाणांना अगदी स्वस्तात भेट देऊ शकता

या स्प्लॅश सेलची ही अट

या सेलचा फायदा दिल्ली-जयपूर (Delhi-Jaipur) सारख्या मार्गांच्या फ्लाइटमध्ये उपलब्ध होईल. ही ऑफर(Offer) देशातील काही खास मार्गांवरच उपलब्ध असेल.यासोबतच बुकिंगच्या तारखा आणि तारखेच्या अटीही (Terms) ठेवण्यात आल्या आहेत.

अशा परिस्थितीत, बुकिंग करण्यापूर्वी, तुम्हाला सर्व तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, AirAsia मलेशियाच्या AirAsia समूहाचा भाग आहे, ज्यामध्ये Tata Sons ची एकूण 83.67 टक्के हिस्सेदारी आहे.

AirAsia ने ट्विट करून दिली माहिती

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या ऑफरची माहिती देताना AirAsia ने सांगितले आहे की, जर तुम्ही या पावसाळ्यात प्रवासाची योजना आखत असाल तर तुम्ही AirAsia च्या या फ्लॅश सेलचा लाभ घेऊ शकता.

यामध्ये तुम्ही 1,497 रुपयांमध्ये फ्लाइटने प्रवास करू शकता. या सेलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 10 जुलै 2022 पर्यंत बुकिंग करावे लागेल.

या लोकांना मिळेल ऑफरचा लाभ

या विशेष ऑफरचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असेल. यामध्ये केवळ काही प्रवाशांना 1,497 रुपयांमध्ये फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरचा लाभ केवळ 15 फ्लाइटच्या प्रवाशांना मिळणार आहे.

दुसरीकडे, NeuPass सदस्यांना केवळ 1,300 रुपयांमध्ये फ्लाइट बुकिंगचा लाभ मिळेल. मूळ भाडे, सेवा कर या शुल्कामध्येच समाविष्ट आहे. तुम्हाला सुविधा शुल्क किंवा जेवणाचे शुल्क वेगळे भरावे लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts