Airtel vs Jio : सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना कमी किमतीत जास्त फायदे देतात. भारतात रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे असंख्य ग्राहक आहेत. कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर घेऊन येत असते.
प्रत्येक कंपन्यांचे रिचार्जच्या किमती वेगवेगळ्या असतात. तसेच त्यांचे फायदेदेखील वेगवेगळे असतात. सध्या अशी एक कंपनी आहे जी आपल्या कंपन्यांना 250 रुपयांपेक्षा कमी किमतीत 18GB अधिक डेटा देत आहे. तसेच अनेक अतिरिक्त फायदे देत आहे.
रिलायन्स जिओचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
सर्वात अगोदर त्याच्या 179 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलूया. या प्लॅनमध्ये तुम्हाला २४ दिवसांची वैधता मिळत असून कंपनी तुम्हाला दररोज 1 GB डेटा आणि 100 एसएमएस प्रतिदिन अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देते.
रिलायन्स जिओचा 239 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. तसेच कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल सुविधेसह दररोज 100SMS मिळेल.
एअरटेलचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
हे लक्षात घ्या की Airtel सुद्धा Jio प्रमाणे 179 रुपयांचा प्लॅन ऑफर करत असून परंतु तो त्या प्लॅनपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. कॉलिंगसाठी हा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 2GB डेटा, 300SMS आणि 28 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देखील मिळेल.
एअरटेलचा 239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Jio प्रमाणे, Airtel चा 239 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता मिळू शकते. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 1GB दैनिक डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल ऑफर करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एअरटेलचे दोन्ही प्लॅन Amazon Prime Mobile Edition सबस्क्रिप्शनसह येत आहेत.
Jio Vs Airtel प्लॅन
समजा एअरटेल आणि जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, जिओ एअरटेलपेक्षा जास्त फायदे देतो. Jio च्या 239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Airtel पेक्षा 18GB जास्त डेटा मिळेल.