मुंबई : मंदिर-मशिदीवर (temple-mosque) वणवा पेटवताना सगळय़ांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ‘ऐशी तैशी’ सुरू आहे. देशभरात धर्माच्या (religion) नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्डय़ांत देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!” अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“मंदिर-मशिदीचे व औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याचे वाद आपल्या देशात कधीच संपणारे नाहीत. कारण राजकीय भाकऱ्या त्याच आगीवर पेटवल्या जात आहेत, पण या आगीपेक्षा पोटाची आग महत्त्वाची आहे.
त्या आगीचा वणवा पेटल्यावर काय होते त्याचे ‘पेटते’ उदाहरण बाजूच्या श्रीलंकेत (sri lanka) दिसते आहे. महागाई (Inflation), भूक, आर्थिक अराजकतेतून निर्माण झालेल्या प्रश्नांवर धार्मिक मुद्दे विजय मिळवू शकले नाहीत, असे सामानातून सांगण्यात आले आहे.
तसेच भारतात हनुमान चालिसा, भोंगा प्रकरण लोकांनी अधिक मनावर घेतलं नाही. प्रत्येक वेळी एखादी नवी रामकथा किंवा कृष्णकथा रचायची असे प्रकार भाजपकडून सुरू आहेत.
ताजमहालच्या (Taj Mahal) जमिनीखाली काय दडलंय तेसुद्धा खणून काढा, अशी मागणी यांच्यापैकीच काही जणांनी करावी ही गंमत आहे असा टोला भाजपला (Bjp) सामनामधून लगावला आहे.