Ajab Gajab News : जगात अशी अनेक रहस्य (Mystery) आहेत, ज्याविषयी अजूनही संशोधन (Research) चालू असून त्यातून गूढ उलघडलेली नाहीत. आज असेच एक रहस्य आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे.
जगात एक असे गाव आहे जिथे १२ वर्षांपासून फक्त मुलीच (girl) जन्माला येत आहेत, म्हणजेच इतक्या वर्षात एकही मुलगा जन्माला आलेला नाही. हे जाणून घेणे विचित्र वाटेल, परंतु हे अगदी खरे आहे. गावाचे हे रहस्य जाणून शास्त्रज्ञही हैराण (Scientists are perplexed) झाले आहेत. या गावात असे का होत आहे, हेही त्यांना कळू शकलेले नाही.
एका मीडिया रिपोर्टनुसार, हे रहस्यमय गाव पोलंडमध्ये (Poland) आहे ज्याचे नाव मिजेस्के ओड्रझिस्की (Mijeske Odrzysky) आहे. गेल्या १२ वर्षात या गावात एकही मुलगा जन्माला आलेला नाही, इथे फक्त मुलीच जन्माला येतात.
येथील महापौरांनी सन २०१९ मध्ये एक घोषणा केली जी अतिशय आश्चर्यकारक आहे. गावात कोणाला मुलगा झाला तर त्या कुटुंबाला बक्षीस देऊ, अशी घोषणा महापौरांनी केली होती.
जेव्हा शास्त्रज्ञांना या गावाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी हे रहस्य जाणून घेण्यासाठी संशोधन केले. मात्र खूप संशोधन करूनही त्यांना यश मिळू शकले नाही. या गावात मुलगा का जन्माला आला नाही हे शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत.
केवळ वैज्ञानिकच नाही तर पत्रकार आणि टीव्हीवर काम करणाऱ्या लोकांनी या गावावर संशोधन केले आहे. मात्र आजपर्यंत या गावाचे गूढ कोडेच राहिले आहे.
जगातील या अनोख्या गावात ३०० लोकसंख्या आहे. एकदा अग्निशामक दलाच्या युवा स्वयंसेवकांसाठी विभागीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि गावाची संपूर्ण टीम मुलींची होती. तेव्हापासून ते गावात चर्चेत आले आहे.
प्रदेशाच्या महापौर, क्रिस्टीना झिडझियाक यांनी गावाचे वर्णन केले की मिजेस्के ओड्रझिस्कीची स्थिती विचित्र आहे. गावात फक्त मुलीच का जन्माला येतात, याचे गूढ शास्त्रज्ञांनी उकलण्याचा प्रयत्न केल्याचे महापौर म्हणाले. पण शास्त्रज्ञ हे रहस्य उलगडू शकले नाहीत.