Ajab Gajab News : जगात अनेक चालीरीती आणि परंपरा (Tradition) आहेत. त्यातील काही परंपरा तुम्हाला ही माहिती असतील. पण काही परंपरा अशा असतात की त्या ऐकून तुम्हाला त्यावर विश्वास देखील बसणार नाही. प्रत्येकाच्या धर्म (Religion) आणि जाती नुसार परंपरा असतात.
आज तुम्हाला इंडोनेशियातील एका गटाबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक आपल्या मृत मुलांचे (Dead child) मृतदेह झाडाचे खोड (Tree trunk) पोकळ करून दफन (Burial) करतात. होय, मृतदेह झाडाच्या आत पुरण्याची परंपरा आहे.
ही विचित्र परंपरा इंडोनेशियातील (Indonesia) ताना तारोजामध्ये (Taana Taroja) मानली जाते. येथे राहणार्या इतर प्रौढ लोकांचे अंतिम संस्कार (Funeral) नेहमीच्या पद्धतीने केले जातात, परंतु जेव्हा जेव्हा मुलाचा मृत्यू होतो तेव्हा ही परंपरा पाळली जाते. मुलाच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये शोककळा पसरते, परंतु आपल्या मुलाला निसर्गाशी जोडण्याचा उत्साह त्यांना अभिमानाने भरतो.
मृतदेह झाडाच्या खोडात घातला जातो
इंडोनेशियातील हे लोक त्यांच्या मुलांचा मृत्यू झाल्यावर ही पद्धत अवलंबतात. त्यासाठी झाडाची खोड आतून आधीच पोकळ केली जाते. यानंतर, जेव्हा मुलाचा मृत्यू होतो, तेव्हा ते कापडात गुंडाळले जाते आणि या झाडाच्या खोडात टाकले जाते.
यामुळे मृत शरीर हळूहळू नैसर्गिकरित्या झाडाचा एक भाग बनते. लोक म्हणतात की या जगातून निघून गेल्यावरही ते मूल तिथे कायम झाडाच्या रूपात राहते.
हिरवे झाड बनते
ही परंपरा इंडोनेशियातील मकासरपासून 186 मैलांवर राहणाऱ्या ताना तारोजामध्ये असल्याचे मानले जाते. लोक आपल्या मुलांना झाडाच्या खोडामध्ये गाडतात आणि झाडाला आपले मूल समजू लागतात.
झाडांच्या आत असलेली पोकळ जागा इथे राहणाऱ्या लोकांनी बनवली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की भलेही देव त्यांचे मूल त्यांच्यापासून काढून घेतो, परंतु ही परंपरा त्यांचे मूल दूर जाऊ देत नाही. तो नेहमी त्याच्या पालकांच्या जवळ असतो.