ताज्या बातम्या

आम्ही निवडून येण्याची चिंता अजितदादांनी करु नये; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला

मुंबई : राज्यातील विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधपक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायाला मिळत आहे.

सभागृहामध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘जे शिवेसना सोडून गेलेत त्यांना कोणी पुन्हा निवडून देत नाहीत, हे लक्षात ठेवावे‘, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटलांनी देखील अजित पवारांना खोचक सल्ला दिला आहे.

आम्ही निवडणुकीत जिंकून येण्याची चिंता अजितदादांनी करु नये. हिंदुत्वाचे रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. आम्ही प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. मला काही लोकांनी टपरीवाला म्हणून हिणवलं म्हणून दादा आम्ही शिवसेना सोडली नाही. हिंदुत्वाच्या विचारावर फारकत घेऊ नये म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे सांगत गुलाबराव पाटलांनी बंडखोर म्हणणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts