ताज्या बातम्या

Samsung Offer : वापरकर्त्यांसाठी भन्नाट ऑफर! इतक्या स्वस्तात खरेदी करता येणार स्मार्टफोन

Samsung Offer : सॅमसंगने आपल्या Galaxy A23 या स्मार्टफोनवर एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या फोनची किंमत 23,990 रुपये इतकी आहे. परंतु, ऑफरमुळे तुम्ही हा स्मार्टफोन 18,499 रुपयांना खरेदी करू शकता.

त्यामुळे स्वस्तात मस्त आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी हातातून जाऊ देऊ नका. कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये, कंपनीने तुम्हाला 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले दिला आहे. हा फोन 6 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध असून प्रोसेसर म्हणून कंपनीकडून यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे.

तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे दिले आहेत. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 5-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड अँगल शूटर, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे.

सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून ती बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी दोन दिवस आरामात टिकते असा कंपनीने दावा केला आहे.

1 TB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करणारा हा फोन, Android 12 वर आधारित OneUI 4.1 वर कार्य करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, या 4G फोनमध्ये, तुमच्याकडे Dual SIM, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac 2.4G+5GHz, VHT80, Bluetooth 5.0, GPS, GLONASS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm सारखे पर्याय आहेत. हेडफोन जॅकही मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts