Amitabh Bachchan : बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील सोशल मीडियावर चर्चेत राहतात. अमिताभ बच्चन यांचे देशातच नाहीतर संपूर्ण जगात चाहते आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो अमिताभ बच्चन नेहमीची कोणत्या कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहतात. पुन्हा एकदा आता बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन चर्चेत आले आहे. यावेळी ते आपल्या लग्नामुळे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. तुम्हाला माहिती असेल कि अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया बच्चनसोबत लग्न केला आहे.
अभिनेत्री जया बच्चन यांनी एका नव्या नावेलीच्या “What The Hell Navya” या पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. यामुळे सध्या अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले कि अमिताभ बच्चन यांनी लग्न करण्यापूर्वी एक मोठी अट घातली होती. चला तर जाणून घ्या त्या अतिबद्दल संपूर्ण माहिती.
“What The Hell Navya” या पॉडकास्टमध्ये जया बच्चन म्हणाली कि अमिताभ बच्चन यांना 9 ते 5 नोकरी करणारी पत्नी हवी नव्हती आणि जंजीर चित्रपटाच्या यशानंतर अमित जी आणि त्यांचे सर्व मित्र लंडनला जाण्याच्या तयारीत होते, ज्यामध्ये त्यांचाही समावेश होता.
मात्र अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटींमुळे दोघांनाही लग्न करावे लागले. लंडनला जाणाऱ्या मैत्रिणींमध्ये जयाही असल्याचे हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर त्यांनी सांगितले की, जया आणि अमिताभ यांना एकत्र लंडनला जायचे असेल तर प्रथम दोघांना लग्न करावा लागेल. मग काय वडिलांची ही अट दोघांनीही मान्य केली आणि दोघांनी लग्नासाठी होकार दिला.
पुढे जया बच्चन बोलत असताना म्हणाल्या की, ऑक्टोबरमध्ये माझे काम कमी झाले असते, त्यामुळे आम्ही ऑक्टोबर महिन्यात लग्नाची मागणी केली होती, मात्र अमिताभ बच्चन म्हणाले होते की, सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत कामकरणारी बायको नाही पाहिजे. तू तुझं काम कर पण रोज नाही, योग्य लोकांसोबत योग्य प्रोजेक्टवर काम कर, या अटीवर मी होकार दिला, मग दोघांचं लग्न झालं.
हे पण वाचा :- Best Selling Sedan Cars: देशात ‘ह्या’ आहे सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5 सेडान कार्स ; लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क