अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- कर्जात बुडालेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (RNEL) आता मुंबईचे उद्योगपती निखिल व्ही मर्चंट यांच्या नावावर होणार आहे.(Anil Ambani)
लिलाव प्रक्रियेत ते सर्वाधिक बोली लावण्याच्या शर्यतीत टॉपवर होते. निखिल मर्चेंट आणि त्यांच्या पार्टनर्सच्या कन्सोर्टियम हेझेल मर्कंटाइल प्रायव्हेट लिमिटेडने तिसऱ्या राउंडदरम्यान सर्वात मोठी बोली लावली.
कमिटी ऑफ क्रेडिटर्सने गेल्या महिन्यातच या लिलाव प्रक्रियेत सहभागी कंपन्यांशी संवाद साधून, उच्च ऑफर्सची मागणी केली होती. यानंतर, हेजल मर्कंटाइलने शिपयार्ड साठी 2700 कोटी रुपये एवढी बोली लावली .
यापूर्वी त्यांनी 2,400 कोटी रुपयांची बोली लावली होती. रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंगवर सुमारे 12,429 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
तसेच RNEL वर एसबीआयचे 1,965 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर युनियन बँक ऑफ इंडियाचे सुमारे 1,555 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
अनिल अंबानींच्या या कंपनीसाठी यापूर्वी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी एक दुबईस्थित एनआरआय समर्थन सलेली कंपनी होती,
त्यांनी केवळ 100 कोटी रुपयांची बोली लावली होती. तसेच उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या कंपनीने 400 कोटींची दुसरी बोली लावली होती.