अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक ?

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक होण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील सोमवारी चौकशीला गैरहजर राहिले.

त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत? असा प्रश्न ED ला पडला आहे. यासंदर्भात आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा असून “अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नाही”, असं ईडीचं म्हणणं आहे.

त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. ईडीचा देशमुखांविरोधआत पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला.

ईडीच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना अप्रामाणिक हेतूने मुंबईतील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत विविध ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून अंदाजे 4.70 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

पुढे, दिल्लीस्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख परिवाराने 4.18 कोटींच्या पैशाची उधळपट्टी केली आणि श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टमध्ये प्राप्त झालेली रक्कम दाखवून काळा पैसा कायदेशीर केल्याचा अंदाज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts