ताज्या बातम्या

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने जामीन अर्ज नाकारला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन (Bail) अर्जावर महत्वाचा आदेश दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जमीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध २९ डिसेंबर २०२१ ला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नियमित जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला आहे.

अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड (Arthur Road Jail) कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने नुकताच अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये जबाब नोंदवून होता.

तसेच या प्रकरणाशी जे संबंधित आरोपी आहेत त्यांचाही जबाब सीबीआयने नोंदवला आहे. आपल्या जवाबात यांनी काय माहिती दिली याबाबत त्यांनी जास्त काही बोलण्यास अॅड. जयश्री पाटील यांनी नकार दिला होता.

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रही लिहले होते.

सचिन वाझे याला अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिले असल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts