ताज्या बातम्या

“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही” फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर अनिल गोटेंची प्रतिक्रिया

मुंबई : गेली काही दिवस झाले राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. काळ विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही पुरावे पेन ड्राईव्ह (Pen drive) मध्ये दिले आहेत.

माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत.

फोन टॅपिंगवरुन (Phone Taping) त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. म्हजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही का? असा प्रश्न अनिल गोटे यांनी फडणवीसांना विचारला आहे.

फोन टॅपिंग करायचे काही नियम आहेत की नाही? फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केलेलं आहे. फडणवीसांनी हे आरोप सिद्ध करावेत असे आव्हानही अनिल गोटे यांनी फडणवीसांना केले आहे.

माझे नाव घेतले याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आले नसते. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असे त्यांनी (फडणवीसांनी) म्हटलंय.

माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्याने येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं?

म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होते. असे आरो अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts