अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजासाठी मोठे काम उभे केले आहे.त्यांचे काम आमच्या तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे.
हजारे यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा मिळाली असल्याचे प्रतिपादन क्रीडा व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. मंत्री आदिती तटकरे रविवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तटकरे बोलत होत्या. आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तहसीलदार ज्योती देवरे, सरपंच जयसिंग मापारी, शरद मापारी, दत्ता आवारी,शाम पठाडे, संदीप पठारे, अन्सार शेख, सतीश भालेकर, सदाशिव पठारे आदी उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या, नगर जिल्ह्याचा दौरा निश्चित झाल्यावर लगेचच हजारे यांची भेट घेण्याचे ठरवले.राळेगण सिध्दीत आल्यावर येथे झालेल्या विकासाची माहिती घेतली.
समाज हितासाठी हजारे यांनी मोलाचे योगदान दिले. हजारे म्हणाले, शुध्द आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्वे अंगिकारल्यास विकासासाठी ऊर्जा, बळ मिळते.