ताज्या बातम्या

मोदी सरकारचा आणखी एक धक्का, आता संसदभवनात….

India News:असंसदीय शब्दांची सुधारित यादी जाहीर करून सरकार विरूद्ध टीका करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यावरून लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याची टीका सुरू असतानाच सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे.

आता संसद भवन परिसरात निदर्शने, धरणं आंदोलन, उपोषण करण्यास मनाई करण्यात आली आहे.संसद भवन सचिवालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार खासदारांना संसद भवन परिसरामध्ये आता निदर्शने, धरणं आंदोलन, उपोषण, धार्मिक विधी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

विविध प्रश्नांवर विरोध पक्षाच्या खासदारांकडून संसद भवन परिसरात अशी आंदोलने केली जातात. लोकसभा किंवा राज्यसभा अधिवेशनातून सभात्याग केल्यावर खासदार संसद भवनात निदर्शने करून आपल्या भावना व्यक्त करतात.

आपला आवाज सरकार आणि जनतेपर्यंत पोहचविण्याचे माध्यम म्हणून अनेक वर्षांपासून संसद तसेच राज्याच्या विधान भवनातही अशी अंदोलने होतात. अर्थात त्यात अनेकदा राजकारणही असते. यापुढे मात्र संसद भवनात अशी आंदोलने करता येणार नाहीत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office