ताज्या बातम्या

Whatsapp feature : आले आणखी एक शानदार फीचर, वापरकर्त्यांना असेही फोटो पाठवता येणार

Whatsapp feature : Whatsapp आपल्या वापरकर्त्यांसाठी जबरदस्त फीचर्स घेऊन येत असते. याचा वापरकर्ते पुरेपूर फायदा घेतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी कंपनीने काही भन्नाट फीचर्स आणली होती. अशातच पुन्हा एकदा Whatsapp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी एक फीचर आणले आहे.

लवकरच या फीचरचा लाभ वापरकर्त्यांना घेता येणार आहे. या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांना फोटो शेअर करण्यापूर्वी त्यांना जबरदस्त एडिटिंग करता येणार आहे. त्यामुळे जाणून घेऊयात हे फिचर काय आहे? त्याचा वापरकर्त्यांना काय फायदा होणार?

WABetaInfo कडून सांगितले जात आहे की अॅपच्या ड्रॉईंग टूलमध्ये एक रीडिझाइन केलेला टेक्स्ट एडिटर देण्यात येतआहे, ज्यामुळे आता वापरकर्त्यांना तो फोटो पाठवण्यापूर्वी संपादित करता येईल. या टूलमध्ये तीन नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला असून आता इमेज एडिटिंग युजर्ससाठी अधिक सोपे आणि मजेदार होईल.

असे करेल फिचर काम

व्हॉट्सअॅपच्या पहिल्या फीचरच्या मदतीने यूजर्सना स्क्रीनवर दिसणार्‍या फॉन्ट ऑप्शनवर टॅप करून फॉन्ट बदलण्याचा पर्याय दिला जाणार आहे . हा पर्याय कीबोर्डच्या वर असून त्यामुळे आता मॅन्युअल सूचीमध्ये न जाता फॉन्ट सहज बदलता येत आहे. तसेच आणखी एक फीचर टेक्स्ट अलाइनमेंटमध्ये मदत करेल आणि फोटो, व्हिडिओ किंवा gif मध्ये मजकूरचा समावेश करणे सोपे होईल.

तर तिसऱ्या फीचरमुळे यूजर्सना आता कोणत्याही टेक्स्टचे बॅकग्राउंड बदलता येईल. समजा एखादा मजकूर स्पष्ट दिसत नसेल तर, त्याच्या पार्श्वभूमीचा रंग सेट केला जाऊ शकतो किंवा तो स्वतंत्रपणे हायलाइट करता येईल. नवीन टेक्स्ट एडिटर सध्या डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे आणि तो WhatsApp च्या भविष्यातील अपडेटचा भाग बनवला जाऊ शकतो.

मूळ गुणवत्तेत फोटो शेअर करता येईल

वापरकर्त्यांना लवकरच मूळ गुणवत्तेमध्ये फोटो शेअर करता येईल. त्यामुळे अॅपवर वापरकर्त्यांचे फोटो पाठवला तर त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही.

असेही स्टेटस ठेवता येईल

वापरकर्त्यांना आता स्टेटसमध्ये ऑडिओ नोट्स शेअर करता येणार आहे, जिथे सध्या फक्त मजकूर, फोटो आणि व्हिडिओ 24 तास शेअर केले जात आहेत. या ऑडिओ नोट्स देखील आता 24 तासांनंतर आपोआप गायब होतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts