ताज्या बातम्या

पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांची माफी मागतो – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

Maharashtra News:“ज्या समाजाने मला मानपान दिला, त्यांची एकदा काय एक लाख वेळा माफी मागेन. मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागत आहे”,

अशा शब्दांत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर मराठा समाजाची बिनशर्त आणि सपशेल माफी मागितली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मंत्री सावंत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

त्यांच्याविरूद्ध राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सावंत यांनी आपल्या भाषणात ‘तर तुम्हाला आत्ताच आरक्षणाची खाज सुटली का?’ तसेच ‘फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं २०१७ मध्ये मराठ्यांची झोळी भरली.’

या त्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. आता सावंत यांनी माफी मागून खुलासाही केला आहे, त्यांनी म्हटले आहे, काही जण मराठा आणि इतर समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,

त्याविषयी मला बोलायचे होते. पण माझे बोलणे अर्धवट दाखवून त्याचा विपर्यास करण्यात आला. माझे म्हणणे इतकेच होते की, नव्या सरकारला आणि मंत्र्यांना कायदेशीर कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी थोडी फुरसत द्या.

त्यासाठी आम्हाला २०२४ पर्यंतची मुदत द्या. तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी होईन, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts