महापालिकेच्या आयुक्तपदी यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- महानगरपालिका आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नगर विकास आणि या संदर्भात आदेश काढले असून त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर शहर दौऱ्यावर आहेत.

त्याच वेळी शंकर गोरे यांचा महापालिका आयुक्तपदी नियुक्तीचा आदेश निघाला आहे. तसा आदेश आज दि. १२ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेस मिळाला.

शंकर गोरे हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपरिषदेवर मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. गोरे यांनी पदभार स्वीकारून त्याचा अहवाल तत्काळ शासनाला सादर करायचा आहे.

तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार हे निवृत्त झाल्यानंतर आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts