Holi : लवकरच फेब्रुवारी महिना संपेल. मार्च महिन्यातील सर्वात महत्त्वाचा होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अनेकजण नोकरी करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी किंवा इतर कारणामुळे दुसऱ्या शहरात किंवा राज्यात राहत आहेत.
जेव्हा जेव्हा एखादा सण येतो तेव्हा घरापासून लांब राहणाऱ्या व्यक्तींना आपल्या कुटुंबासोबत तो सण साजरा करावासा वाटतो. परंतु, सणामुळे सर्वचजण घरी जात असल्याने रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी अडचण निर्माण होते. जर तुम्हालाही ही समस्या येत असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने तिकीट मिळवू शकता.
फॉलो करा या टिप्स
क्रमांक १
जर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळाले नसेल तर तुम्ही रोडवेज किंवा व्होल्वो बसने प्रवास करू शकता. सरकारी बस शिवाय अनेक खाजगी बसेस आहेत, ज्या तुम्हाला होळी साजरी करण्यासाठी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकतात.
क्रमांक २
तसेच तुम्ही कॅबनेही तुमच्या घरी जाऊ शकता. कॅबचा प्रवास खूप महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर अनेक कंपन्या शेअरिंग कॅब चालवतात. यात तुम्हाला एक सीट मिळते आणि बाकीच्या जागा इतर प्रवाशांनी बुक केल्या जातात. यामुळे तुमचे पैसे वाचून तुम्ही आरामात तुमच्या घरी पोहोचू शकता.
क्रमांक ३
तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विमानाने घरी जाऊ शकता. विमानाचे तिकीट नक्कीच थोडे महाग असते परंतु तुम्ही ऑनलाइन बुकिंग करून सूट मिळवू शकता. यामुळे तुम्ही ट्रेन, बस किंवा इतर वाहनांपेक्षा घरी लवकर जाऊ शकता.
क्रमांक ४
शिवाय तुम्ही कारने देखील प्रवास करू शकता. जर तुमचे कोणी मित्र तुमच्या घराभोवती राहत असतील आणि ते घरी जात असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता.