ताज्या बातम्या

शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पुतळा उभारला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का?

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेऊन राष्ट्रवादी (Ncp) व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला आहे, यावेळी राज ठाकरे यांनी एक दावा केला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) कधीच शिवाजी महाराजांचं (Shivaji Maharaj) नाव घेत नाही. मी बोलल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केली आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.

यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन पवारांवरील सर्व आरोप फेटाळून लावत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आव्हाड म्हणाले, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी गेला का चैत्यभूमीवर. पाच मिनिटाच्या अंतरावर चैत्यभूमी आहे. कधी तुमच्या हाताने हार घातला का बाबासाहेबांच्या फोटोला? असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राज ठाकरेंना कधी फुले, शाहू महाराजांचं नाव घ्यावसं वाटत नाही. बाबासाहेबाचं नाव घ्यावसं वाटत नाही. बाबासाहेबांबद्दल थोडसं प्रेम आणि आपुलकी असेल तर तुम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

त्याचसोबत महात्मा फुलेंनी समाधी शोधली हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का? शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पुतळा उभारला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का? पुतळा उभारताना शाहू महाराजांना विरोध झाला हे सांगायला लाज वाटते का?

इतिहासाशी खेळू नका. इतिहासात अडकून जाल. ट्रॅप असतो. पुरंदरे त्यातच अडकले. जेव्हा लोकांनी अभ्यास सुरू केला. तेव्हा पुरंदरेंना बाहेर येता आलं नाही. स्वत:च विणलेल्या जाळ्यात ते अडकले, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

Renuka Pawar

Recent Posts