अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- भावजयीवर वाईट नजर ठेवतो म्हणून एकावर वर केल्याची घटबा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे वाकडी या गावात घडली आहे. आकाश रामनाथ जगधने हा किराणा सामान घेऊन घराकडे जात असताना राहुल संपत जगधने हा आकाशला म्हणाला की,तू जास्त माजला आहे,
तू माझ्या भावजयीवर वाईट नजर ठेवतोस,तुला जिवंत ठेवणार नाही असे बोलून आरोपी राहुल जगधने याने फिर्यादी आकाशाच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार केले.
तसेच आरोपी राहुलने त्यानंतर आकाशाच्या मानेवर देखील चाकूने वार केले व म्हणाला की तुझ्या घरच्यांना ही अशाच प्रकारे संपवून टाकीन.
जखमी आकाशला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून श्रीरामपूर तालुका पोलिसांनी त्या ठिकाणी जावून जखमीचा जबाब नोंदवून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 182/2021 भादवि कलम 307,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा घटनास्थळी पोलिस निरीक्षक श्री.साळवे यांनी तात्काळ भेट दिली.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.अतुल बोरसे हे करीत आहेत.