राज्यात पावसाचा धुमाकूळ आतापर्यंत झाला तब्बल ११२ लोकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आलेल्या पुरात ११२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ९९ लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती बचाव आणि पुनर्वसन विभागाने दिली आहे.

एकूण ५३ नागरिक जखमी झाले आहेत. तर ३२२१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुराचे पाणी रस्ते आणि शेतांमध्ये घुसल्याने सांगली जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने या भागात अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवून साधारण १,३५,००० नागरिकांना बाहेर काढले आहे.

बचाव आणि पुनर्वसन विभागाने सांगितले आहे, ‘२४ जुलै रोजी रात्री ९:३० वाजताच्या आकडेवारीनुसार पूरप्रभावित क्षेत्रांतून साधारण १ लाख ३५ हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. एकंदर ११२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३,२११ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

एकूण ५३ लाख लोक जखमी झाले आहेत आणि ९९ लोक बेपत्ता आहेत.’ एका स्थानिक नागरिकाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती बिकट आहे. आता पाणी उतरत आहे. या भागात अनेक कारही अडकलेल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने शनिवारी महाराष्ट्राच्या रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधून बेपत्ता असलेल्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम राबवली.

एनडीआरएफची २६ पथके राज्य शासनाच्या सहाय्याने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग, नगर आणि कोल्हापुरात मदत आणि बचावकार्य करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts