सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींचा वेग वाढला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच चर्चा, बैठकांना जोर आला आहे.

4 मार्चला होणारी सभापती पदाची आणि जूनमध्ये होणार महापौर पदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच त्यावर चर्चा सुरू झाल्याचे समजते.

महाविकास आघाडीच्या बॅनरखाली शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार की पुन्हा पहिली राष्ट्रवादी-भाजप युती कायम राहणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याकरीता राष्ट्रवादी-भाजपने हातमिळवणी केली.

आता मात्र भाजपला दूर ठेवून महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादीला सभापती पद देऊन आगामी महापौर पद घ्यायचे असा एक विचार शिवसेनेत सुरू आहे.

दरम्यान सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाला संमती मिळाल्याचे समजते. शिवसेनेने उमेदवार देण्याची तयारी चालविली असली तरी

मुबईतून होणार्‍या निर्णयाचे पालन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या राजकीय ओढाताणीत भाजप सत्तेतून बाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts